जळगाव(विशेष प्रतिनिधी) – जळगाव शहरातील विविध मुस्लिम बहुल वस्तीमधील सामाजिक कार्यकर्ते आप आपल्या परिसरातील महानगरपालिकेच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्रस्त झाले आहेत वर्तमानपत्रातील बातम्यांमध्ये ज्या भागातील नगरसेवक प्रभावी आहे.त्या भागातील कामे होतात विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचे कामे होत नसल्याच्या तक्रारी वाचण्यात येत आहे. जळगाव शहरात सात मुस्लिम नगरसेवक निवडून आले असून त्यात दोन सत्ताधारी भाजपचे, दोन शिवसेनेचे व तीन एमआयएमचे असून या सात पैकी पाच महिला व दोन पुरुष आहेत. साहजिकच आमच्या त्या महिला नगरसेवकांचा प्रभाव पडत नाही कारण भाषेचा अभाव, मनपा अधिनियमाचा अभ्यास व विरोधी पक्षातील
असल्यामुळे कार्य होत नसल्याची लेखी तक्रार अल्पसंख्याक समाजाच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त सतिश कुलकर्णी यांच्याकडे दिली.
या परिसरात विकास… भकास..
जळगाव शहरातील अकसा नगर, मास्टर कॉलनी, नशेमन कॉलनी, एकबाल कॉलनी, दत्तनगर ,मौलाना आजाद नगर, सालार नगर ,कासमवाडी, मासूम वाडी ,सुप्रीम कॉलनी, उस्मानिया पार्क ,गेंदालाल मिल, हुडको शिवाजी नगर, हूडको पिंपराला, खंडेराव नगर, जोशी पेठ, बागवान मोहल्ला,मन्यार वाडा, तांबापुर, आशा बाबा नगर, दंगलग्रस्त कॉलनी, आय.वाय. पार्क, अशा अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाच्या वस्त्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे विकास कामे होत नसल्याची तक्रार आयुक्त सतीश कुलकर्णी यांना प्रत्यक्ष भेटून दिली.
यावेळी शिष्टमंडळाचे नेतृत्व फारुक शेख यांनी केले. त्यांच्यासोबत मेहरुण येथील अनिस शाह, अकसानगरातील अर्शद खान व आमिर शेख, दत्तनगर -अखिल पठाण, शेरा चौक- अश्फाक शेख,रजा कॉलोनी परिसरातील सलीम इमानदार, अहेले हदीस मस्जिद परिसरातील इंद्रिस पटेल, मौलाना आझाद नगर- कासिम उमर, इकबाल कॉलनी- हारून शेख, मासूमवाडीचे मोहसीन युसुफ, कासमवाडी-अजिज सिकलगर, सालार नगर- अफजल पठाण, मन्यार वाडा- मुजाहिद खान व अब्दुल रउफ, जोशी पेठ- गुलाब बागवान, इस्लामपुरा – अन्वर खान सिकलगर ,उस्मानिया पार्क-परवेज शेख व काद्रि,शिवाजीनगर हुडको – अल्ताफ शेख, गेंदालाल मिल- रईस शेख, पिंपराला हुडको -जाकिर पठाण, शिवाजीनगर – मझहर खान, शनिपेठ नदीम मलिक, आदींचा समावेश होता.
या सुविधेसाठी दिले निवेदन
उपरोक्त वसाहतीमध्ये मुख्य अडचणी म्हणजे रस्ते नाही, गटारी नाही, पाण्याची पाईप लाईन लिकेजेस आहे, स्वच्छतेसाठी घंटागाड्या येत नाही, पाणी पुरवठा वेळेवर होत नाही,आरोग्याच्या सुविधा नाहीत,अस्वच्छता पसरलेली आहे,डेंगूची साथ सुरू झाल्याने त्वरित स्वच्छता करण्यात यावी.
मनपा फंडातून, अल्पसंख्यांक निधीतून अथवा इतर निधीमधून वरील सुविधा उपलब्ध करून द्याव्यात जळगाव शहरातील या अल्पसंख्यांक वस्त्यांमध्ये निधीतून तसेच उपलब्ध असलेल्या इतर निधीमधून या वस्त्यांच्या नागरी सुविधाबाबत त्वरित कामे हातात घेण्यात यावी.अन्यथा मनपा टॅक्स भरणार नाहीत. आपण जर आरोग्य संबंधित व खड्डे बुजवले नाहीतर आम्ही मनपा घरपट्टी अथवा इतर टॅक्स भरणार नाहीत व त्रिव स्वरूपाचे आंदोलन करू अशा स्वरूपाचे निवेदन देण्यात आले.
याप्रकरणी त्वरीत संबधितांना सुचना देतो-आयुक्त
आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी सर्व बाबी ऐकून घेतल्या अर्धा तास चर्चा करून सर्व माहिती दिली व निश्चितच आपल्या या वस्त्यांमधील पाहणी करून अभियंता यांना आवश्यक त्या मनपा सुविधा त्वरित देण्याविषयी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले.