जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथे आज सकाळी 10 वाजता एक महीला पुजा करतांना तिथे नंदी पाणी पित आहे असे आधी तिच्या निदर्शनास आल्यामुळे परिसरातील भक्तांची मोठी गर्दी जमा झाली . अक्षरशः गावातील महिलांनी रांग लावून नंदीला पाणी पाजण्यासाठी त्या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे . ही माहिती वाऱ्यासारखी पसरल्यानन्तर या चमत्काराची सर्वत्र चर्चा होत आहे.
तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथे आज सकाळी 10 वाजता एक महीला महादेव मंदिरात पुजा करतांना तिथे नंदी पाणी पित आहे असे आधी तिच्या निदर्शनास आल्यामुळे परिसरातील भक्तांची मोठी गर्दी झाली . अक्षरशः गावातील महिलांनी रांग लावून नंदीला पाणी पाजण्यासाठी त्या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे . ही माहिती वाऱ्यासारखी पसरल्यानन्तर या चमत्काराची सर्वत्र चर्चा होत आहे दुसरीकडे देवभोळ्या स्वभावाच्या महिला भाविकांची गर्दी होणे स्वाभाविक आहे मात्र हा नेमका प्रकार काय आहे याची शहानिशा होणे गरजेचे आहे , अशा प्रतिक्रिया बरेच लोक मंदिरात झालेली गर्दी पाहून व्यक्त करीत होते . त्यामुळे या ठिकाणीच दोन वेगवेगळे मतप्रवाह भाविकांमध्ये दिसून येत होते . सरपंचांनीही नंदीने माझ्या हातून २ चमचे पाणी पिले असे सांगितल्यावर शिरसोलीतील सगळेच प्रतिष्ठित तेथे जमले होते . काही जिज्ञासू तरुणांनी या घटनेची माहिती जळगावातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली होती . नुकतीच महाशिवरात्र होऊन गेली आणि सध्या मराठी वर्षाचा शेवटचा महिना असून आगामी चैत्र महिन्यातील धार्मिक पर्वाच्या संदर्भाने हे ईश्वरी संकेत असावेत अशी भाविकांची सामूहिक श्रद्धा दिसत होती .