जळगाव ( प्रतिनिधी ) – एक वर्षासाठी समाजात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगाराला पाचोरा प्रांताधिकारी यांनी जळगाव, धुळे आणि नाशिक जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. अशी माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील शनिवारी ४ मार्च रोजी दुपारी ३ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकांवर कळविले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पंकज दीपक मोरे (वय-२४) रा. यशवंत नगर, भडगाव असे हद्दपार केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. दीपक मोरे याच्यावर खुनाचा प्रयत्न, वाळू चोरी आणि सरकारी कर्मचारी यांच्यावर जीवघेणा हल्ला यासह वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशा गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी दिल्या. पाचोरा येथील प्रांताधिकारी यांनी गुन्हेगार पंकज मोरे याला एक वर्षासाठी जळगाव, धुळे आणि नाशिक जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश मंजूर केले आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, सहाय्यक फौजदार युनूस शेख, पोहेकॉ नितीन रावते, पोलीस नाईक रवींद्र पाटील यांनी शनिवारी ४ मार्च रोजी कारवाई करून समाजात दहशत माजविणारा पंकज दिलीप मोरे (वय-२४) रा. यशवंत नगर, भडगाव याला अटक करून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे.