यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील कोरपावली येथे शाळेत जावून येतो असे सांगून गेलेल्या मुलाला अज्ञात व्यक्तीन फूस लावून पळूवन नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, आमीन सिकंदर तडवी (वय-१७) रा. कोरपावली ता. यावल हा मुलगा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. शुक्रवार ३ जून रोजी सकाळी ९ वाजता यावल येथे शाळेत जावून येतो असे सांगून अमीन घराबाहेर पडला. रात्री उशीरापर्यंत तो घरी न आल्याने कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली. त्याचा यावल शहरातील शाळेत, मित्र आणि नातेवाईकांकडे शोध घेतला. परंतू आमीन हा कुठेही आढळून आला नाही. अखेर शनिवारी ४ जून रोजी रात्री त्याची आई आशा तडवी यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय देवरे करीत आहे.