मुंबई (वृत्तसंस्था) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2021-22 चा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. यावेळी कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा आणि विकास करण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील कृषी अधिभार लावण्याची घोषणा केली आहे. आधीच पेट्रोल, डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. याविरोधात आज मुंबई शिवसेनेतर्फे गॅस सिलेंडर डोक्यावर घेत आंदोलन करण्यात आले.
यावेळी केंद्र सरकार तुपाशी, ग्राहक मामा उपाशी, नरेंद्र + देवेंद्र = वसुली केंद्र, अब कि बार पेट्रोल १०० पार, अशा आशयाचे फ्लेक्स हातात घेऊन केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.







