मोर्च्याची जय्यत तयारी सुरू !
जळगाव ( प्रतिनिधी ) – हिंदु महिलांचे जीवन उद्ध्वस्त करणारा लव्ह जिहाद रोखण्यासाठी आणि बळजोरीने, फसवून होणारे हिंदूंचे धर्मांतर याविरोधात कठोर कायदे केले जावेत, जिल्ह्यात सुरू असलेले अवैध कत्तलखाने, चालणारी गोतस्करी यांवर पायबंद घालण्यात यावा आणि गोवंशहत्या बंदी कायद्याचा कठोर अंमलबजावणी केली जावी, तसेच जैन बांधवांचे पवित्र तीर्थक्षेत्र श्री सम्मेदशिखरजी याला पर्यटन स्थळ घोषित करण्याच्या हिंदुद्रोही निर्णयाला विरोध करून त्याचे पावित्र्य रक्षण झालेच पाहिजे या मागण्यांसाठी जळगाव येथे येत्या शनिवारी ७ जानेवारी या दिवशी भव्य हिंदू जनसंघर्ष मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्च्याची माहिती श्री रामदेवबाबा मंदिर, पांडे चौक येथे आयोजित पत्रकार परिषदेत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली.
या संदर्भात प्रत्येक जिल्ह्यात आंदोलने चालू आहेत. मोर्च्यात संपूर्ण जिल्हाभरातून विविध संप्रदाय, हिंदू संघटना आणि विविध ज्ञाती समाज सहभागी होणार आहेत. या पत्रकार परिषदेला सकल जैन संघाचे श्री. दिलीप गांधी, जळगाव जिल्हा माहेश्वरी सभाचे सचिव श्री. मानकचंद झंवर, सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर, योग वेदांत सेवा समितीचे जिल्हा कार्यकारी सदस्य श्री. अनिल चौधरी, हिंदु राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री. मोहन तिवारी यांचीही पत्रकार परिषदेला उपस्थिती होती.
मोर्चा मार्ग : (प्रारंभ) शिवतीर्थ (जी.एस. ग्राऊंड) – स्वा. सावरकर चौक – जिल्हाधिकारी कार्यालय (शेवट) वेळ : सकाळी ११ ते दु. १ वा. ; संपर्क : 9552426439