जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस हर्षवर्धन खैरनार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पाच हजार वृक्ष पूर्ण महाराष्ट्रात लावण्याचा मित्रपरिवाराच्या सहकार्याने निर्धार केला आहे.
खा.सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र समन्वयक सुहास उभे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव महानगर यांच्यातर्फे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जळगाव जिल्हासरचिटणीस हर्षवर्धन खैरनार यांच्या वाढदिवसानिमित्त १३ ऑक्टोबर रोजी संपुर्ण महाराष्ट्रात असंख्य मित्र परिवाराच्या सहकार्याने ५ हजार वृक्ष लावण्याचा निश्चय हर्षवर्धन खैरनार यांनी केला आहे.








