जळगाव ( प्रतिनिधी ) – पेट्रोल संपल्यामुळे मोटारसायकल ढकलत नेणार्या तरुणाला काठ्यांनी बेदम मारहाणीत जखमी करणाऱ्या अज्ञात टोळक्याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोळी पेठेतील जगदिश भोई हा तरुण त्याच्या एमएच १९ डीएल ७९६० क्रमांकाच्या मोटारसायकलने सागर पाटील नावाच्या मित्रसोबत जात होता. मोटारसायकलचे पेट्रोल संपल्यामुळे जगदिश व त्याचा मित्र सागर पाटील मोटारसायकल ढकलत घेवून जात होते. यावेळी आठ ते दहा इसम हातात लाठी काठी व कोयते घेवून गैरकायद्याची मंडळी जमवून दहशत माजवित होते. सागर पाटील याला त्या टोळक्याने मारहाण केली. सागरच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या मोटारसायकलवर मोठे दगड टाकून नुकसान केले आहे जगदिश भोईच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीसात ८ ते १० अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास योगेश सपकाळे हे करीत आहेत.