जामनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील पहूर येथे किरकोळ वादातून पिता -पुत्रास मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहूर बस स्थानक परिसरात संतोष नामदेव चिंचोले यांच्या मालकीचे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. सोमवारी दुपारी रोहित दिपक थोरात उर्फ चिक्या याने दुकानावर येऊन त्यांचा मुलगा दीपक चिंचोले यास टणक वस्तूने डाव्या बाजूच्या बरगडी , दंडावर व पायावर मारहाण करून जखमी केले संतोष चिंचोले ( वय ६४ ) यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली .
या मारहाणीत जखमी दीपक चिंचोले यांना पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून जळगाव येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. संतोष चिंचोले यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रोहित थोरात याचे विरुद्ध पहूर पोलीस स्टेशनला गु.र.ण. ९७ /२०२२ भादवि कलम ४५२ ,३२४, ४२७ ,५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो नि प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भरत लिंगायत तपास करीत आहेत.