जळगाव (विशेष प्रतिनिधी)- जी.एम. फॉऊंडेशन, जळगावचे व्यवस्थापक प्रमुख शिवाजी पाटील सर्वांचे लाडके शिवादादा हे कोरोना विषाणूने त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून शिवा दादा लवकरात लवकर निगेटिव्ह होवोत! पुन्हा एकदा रुग्णांची सेवा त्यांच्या निस्वार्थी हातून घडोत. अशी सर्वजण देवाकडे प्रार्थना करुया अशी हितचिंतकाकडून सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात येत आहे.

खर्या अर्थाने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना निगेटिव्ह करण्यामध्ये जे मानसिक आधार देतात, हिंमत देतात, आधार देतात आणि साथ देतात तेच शिवादादा आज पॉझिटिव्ह आले. हे ऐकून हितचिंतकांच्या मनाला फार फार वाईट वाटले. कारण आजपर्यंत एक नव्हे, दोन नव्हे तर शेकडो पॉझिटिव्ह रुग्णांना बरे करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. असे शिवा दादा जे रुग्णांना सकाळी योगासनांपासुन तर रात्रीच्या जेवणापर्यंतची काळजी घेतात. असे शिवा दादा लवकरात लवकर निगेटिव्ह होवोत आणि पुन्हा एकदा रुग्णांची सेवा त्यांच्या निस्वार्थी हातून घडोत अशी आपण सर्वजण देवाकडे प्रार्थना करुया. शिवादादा तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल. कारण देवासोबत तुमच्यावर आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय भाऊसाहेब गिरीश महाजन, आदरणीय अरविंद भाऊ, तुमचे सर्व सहकारी, सर्व डॉक्टर्स, सर्व सिस्टर्स, उपचार घेत असलेले व उपचार घेवून बरे झालेले सर्व रूग्णांचे शुभाशिर्वाद तुम्हाला आहेत. तुमच्यासोबत सर्वांची तब्येत चांगली राहो! हिच आमच्या सर्व हितचिंतकाकडून आपल्याला शुभेच्छा!







