जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समितीच्या राज्य महासचिवपदी जळगावचे किशोर पाटील कुंझरकर जळगावला मिळाले मानाचे स्थान मिळाले.

मंत्रालय पातळीवर शिक्षकांचे व शिक्षकेतर यांचे अनेक प्रश्न प्रभावीपणे मांडून आपल्या दांडगा जनसंपर्कच्या जोरावर व सर्वस्तरीय आणि सर्वपक्षीय पदाधिकार्यांमध्ये असणार्या मैत्रीपूर्ण संपर्काच्या जोरावर प्रश्न सोडवणे, आधी अनेक सामाजिक शैक्षणिक कार्य करणारे आपल्या स्वकर्तृत्वातून व कार्याच्या माध्यमातून शिक्षण विभागाला आणि शिक्षक चळवळीला प्रेरणादायी अनुकरणीय ठरेल असे दिशादर्शक भरीव कार्य करणारे जळगाव जिल्ह्यातील राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्काराचे व जिल्हा परिषद जळगाव पुरस्काराचे मानकरी असलेले प्रयोगशील शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांची 3 सप्टेंबर रोजी यशस्वीरित्या कार्यकेल्याबद्दल पुढील पाच वर्षासाठी त्यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समितीच्या राज्य महासचिवपदी निवड झाली. त्यांच्या निवडीबद्दल राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. विशाल सोळंकी, शालेय शिक्षण विभागाचे सचिव राजेंद्र पवार, विजय भोसले प्रधान सचिव श्री नंदकुमार, शालेय शिक्षण सचिव वंदना कृष्णा, शिक्षण संचालक डॉ. दिनकर पाटील सहसंचालक दिनकर टेमकर, पूर्व शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेडे, महावीर माने, प्रतिभा भराडे, वाय. आर.सोनवणे, नामदेव माळी आदींसह समन्वय समितीच्या सर्व पदाधिकार्यांनी तसेच सर्व शिक्षक आमदार राज्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी जळगाव जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी अधिकारी गटविकास अधिकारी गटशिक्षणाधिकारी केंद्रप्रमुख शिक्षक आदींनी दूरध्वनीवरून यथोचित निवडीबद्दल शुभेच्छा दिल्यात.







