पारोळा (प्रतिनिधी) – शहरात तसेच तालुक्यात होणाऱ्या चोऱ्याना आळा बसावा यासाठी पारोळा पोलिसांतर्फे दक्षतेचे आवाहन करण्यात आलेले आहे.
लोकांनी बाहेरगावी जातांना घरात दागिने, पैसे ठेऊ नये. लॉकर मध्ये ठेवावे. बाहेरगावी जातांना घराचे गेट, सेफटी डोअर, मुख्य दरवाजा, कपाटाचे व कपाटातील लॉकर लॉक करावे. घरासमोर,,घरात सीसीटीव्ही बसवून घ्यावे . घर बंद न ठेवता नातेवाईक अगर विस्वासु इसम घरी ठेवावा असे उपाय पोलिसांनी सुचवले आहेत .
.आपापले मोहल्यात वर्गणी गोळा करून सीसीटीव्ही बसवून घ्यावा. रात्री कुत्र्याचा भुंकण्याचा अगर कुठलाही आवाज आला तर घराबाहेर येऊन पाहावे. रात्रीचे वेळी घराबाहेरील लाईट चालू ठेवावे.. दिवसा अगर रात्री कोणीही संशयित फिरतांना दिसल्यास त्यास नाव पत्ता विचारून त्याचा फोटो काढावा व पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी. सध्या उन्हाळ्यात रात्री बरेच लोक घराचे बाहेर किंवा छतावर झोपतात परंतु घराचा दरवाजा व्यवस्थित बंद करीत नाही.घरासमोर लाईट व लॉक लावावे.पोलीस पाटील यांनी गावात अगर गावाचे बाहेर येऊन पाल ठोकून राहणारे लोकांचे मुशाफिरी रजिस्टरला नोंद घेणे.व त्यांचे मोबाईलवर फोटो काढून ठेवणे.असे उपाय पोलिसांनी सुचवले आहेत .
शेतकऱ्यांनी जनावरे घेऊन एकटे शेतात ठेऊ नये. गावात वर्गणी करून गावात येणारे-जाणारे मुख्य रस्ते, महत्वाचे चौकात सीसीटीव्ही लावून घ्यावे, पोलीस मित्र व ग्राम सुरक्षादल याना नेमून दिलेली ड्युटी समाजसेवा समजून करणे. चोरी ,घरफोडी अगर इतर चोरी संदर्भात माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे ,माहिती देणाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पो नि रामदास वाकोडे यांच्या कडून करण्यात आले आहे.