जळगाव (प्रतिनिधी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३२ व्या जळगाव शहर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सतीश गायकवाड यांची निवड एका बैठकीत नुकतीच करण्यात आली आहे. समितीच्या उपाध्यक्षपदी विशाल वाघ आणि वाल्मिक सपकाळे यांची निवड करण्यात आली आहे.
जयंती उत्सव समितीच्या सचिवपदी राहुल भालेराव तर कार्याध्यक्षपदी शंभू भोसले यांची निवड झाली आहे. याशिवाय सल्लागारपदी मुकुंद सपकाळे, दिलीप सपकाळे, नगरसेवक सुरेश सोनवणे, हरिश्चंद्र सोनवणे, अनिल अडकमोल, मिलिंद सोनवणे, भारत ससाणे हे आहेत. बैठकीला किरण सोनवणे, विशाल अहिरे, रमेश सोनवणे, चंद्रमणी मोरे, भारत सोनवणे, जितेंद्र केदार, सिद्धार्थ बिऱ्हाडे आदी उपस्थित होते.