जळगाव ( प्रतिनिधी ) – शिरसोली प्र.बो. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सन 2022 ते 2027 या कालावधीसाठीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. ३ पॅनल मैदानात असले तरी जनसेवा शेतकरी सहकार विकास पॅनल प्रभावी असल्याचे सहकारी क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
जनसेवा शेतकरी सहकार विकास पॅनलचे 13 उमेदवार निवडणूक लढवित आहेत . या संस्थेच्या विकासासाठी व शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जनसेवा शेतकरी सहकार विकास पॅनल निवडणूक लढवीत आहे.
जनसेवा शेतकरी सहकार विकास पॅनलने कर्जदार खातेदार सर्वसाधारण मतदारसंघातून गोकुळ बारी , राजू बारी , विजय निळकंठ बारी , सुभाष बारी , विजय रुपला बारी , समाधान बोबडे, ज्ञानेश्वर माळी , बाळू पाटील यांना उमेदवारी दिली आहे . या मतदारसंघात मतदारांना ८ मते देण्याचा अधिकार आहे . महिला राखीव मतदारसंघातून सुरेखा बारी आणि सकुबाई पाटील या जनसेवा शेतकरी सहकार विकास पॅनलच्या उमेदवार आहेत. या मतदारसंघात मतदारांना २ मते देण्याचा अधिकार आहे.
इतर मागासवर्गीय मतदारसंघात उत्तम बारी , भटके विमुक्त जाती – जमाती मतदारसंघात शेनफडू पाटील आणि अनुसूचित जाती – जमाती मतदारसंघात रामकृष्ण नेटके हे जनसेवा शेतकरी सहकार विकास पॅनलचे उमेदवार आहेत .
हे सर्व उमेदवार ‘ पतंग ‘ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत . उद्या ५ जून रोजी शिरसोली प्र. बो. तील जिल्हा परिषद शाळा या मतदान केंद्रावर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे . जिल्ह्यातील सहकार क्षेत्रासह तालुक्याचे लक्ष लागलेले असलेल्या या निवडणुकीची उत्कंठा जनसेवा शेतकरी सहकार विकास पॅनलने सभासद मतदारांपुढे मांडलेल्या मुद्द्यांमुळे वाढलेली आहे.