नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संबंधात केंद्र सरकारने आता त्यांची चारही बाजूने नाकाबंदी करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. मोठमोठी बॅरिकेट्स टाकून त्यांचा संपर्क तोडला जात आहे. सीमांवर तारांचे पक्के कुंपण टाकण्यात आले आहेत. एवढेच नव्हेतर रस्त्यावर चक्क खिळेही ठोकण्यात आले आहेत. या व्यवस्थेवर सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. यानंतर सीमेवरील खिळे हटविण्यात येत आहेत. परंतु, हे खिळे दुसरीकडे लावणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
सकाळी जवळपास ११ वाजता खिळे गाझीपूर सीमेवरून हटविण्यात आले. तेथील कामगारांना याबद्दल विचारले असता कोणीही उत्तर दिले नाही. तर दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हंटले कि, रणनीतिक दृष्टीतून हे खिळे दुसर्या ठिकाणी लावण्यात येणार आहे. म्हणून येथून काढण्यात येत आहेत. आम्हाला जिथे खिळ्यांची गरज पडेल तेथे आम्ही हे लावू, असे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, दिल्ली आणि गाझीपुर सीमा तसेच दिल्ली आणि हरियाना सीमेवर सरकारने हे अडथळे उभारले आहेत त्या अनुषंगाने शेतकरी आंदोलक यांनी ही भाष्य केले आहे. ‘आम्ही शेतकरी आहोत. गरज पडली तर लाथ मारू तेथे पाणी काढू, या परिस्थतीला आम्ही घाबरुन जाऊ असा सरकारने अजिबात विचार करू नये. आम्ही इथून माघारी जाणार नाही.







