जळगाव ( प्रतिनिधी ) – आय एम ए जळगाव शाखेचा पदग्रहण समारंभ गोदावरी फाउंडेशन यांच्या सहकार्याने हॉटेल कमल पॅराडाईज येथे नुकताच आय एम ए राज्य अध्यक्ष डॉ सुहास पिंगळे , राज्य सचिव डॉ मंगेश पाटे, गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील, एच बी आय बोर्डाचे डॉ अनिल पाटील, डॉ स्नेहल फेगडे यांच्या उपस्थितीत पार पडला
नव निर्वाचित अध्यक्ष डॉ दीपक आठवले यांनी मावळते अध्यक्ष डॉ सी जी चौधरी यांच्याकडून व नवनिवर्चीत सचिव डॉ जितेंद्र कोल्हे यांनी मावळते सचिव डॉ राधेश्याम चौधरी यांच्याकडून सूत्रे घेतली नवनिर्वाचित कार्यकारणीत उपाध्यक्ष डॉ सुनील नहाटा, जॉईंट सेक्रेटरी डॉ सुशील कुमार राणे व डॉ धीरज चौधरी, खजिनदार डॉ पंकज पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ विनोद जैन, कार्यकारणी सदस्य डॉ राहूल मयूर, डॉ पंकज, डॉ किशोर पाटील, डॉ अनघा चोपडे, डॉ सारिका पाटील, डॉ दीपक पाटील यांचा समावेश आहे .
काल डॉ अनिल पाटील यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाला यावर्षीपासून दोनशे जागा देण्यात आल्यामुळे सर्वांनी डॉ उल्हास पाटील यांना शुभेच्छा दिल्या
जळगाव आय एम ए पुढील वर्षी राष्ट्रीय स्तरावरील एसबीआय बोर्डाची कॉन्फरन्स आयोजित करणार आहे गोदावरी फाऊंडेशन व आय एम ए जळगाव पूर्ण तयारीनिशी ही कॉन्फरन्स यशस्वी करू , असे सदस्यांनी सांगितले.