जामनेर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जामनेर शाखेची नुकतीच बैठक झाली. बैठकीत आगामी उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. जिल्हा कार्यकारिणीत निवड झालेल्या सभासदांचा सन्मान करण्यात आला. पुढील महिन्यात राज्य सरचिटणीसांचा दौरा आयोजित होणार असल्याची माहिती देण्यात आली.
बैठकीला जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम चळवळीचे गीत सादर करण्यात आले. त्यानंतर मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. ९ एप्रिल रोजी झालेल्या जिल्हा प्रेरणा मेळावाबाबत जिल्हा प्रधान सचिव प्रल्हाद बो-हाडे यांनी सभासदांना माहिती दिली. नवीन निवड झालेल्या जिल्हा कार्यकारिणीत प्रल्हाद बो-हाडे यांची जिल्हा प्रधान सचिव म्हणून निवड झाल्याने त्या जागेवर प्रधान सचिव म्हणून बी. आर. पाटील सर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच, जातिअंत संकल्प विभाग या जागेवर युवराज शंकर अहिरे यांची निवड झाली.
निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जामनेर शाखेचे अध्यक्ष जे.डी. पाटील यांचे हस्ते पुस्तक व पुष्प देऊन जिल्हा कार्यकारिणीत निवड झालेल्या सभासदांचा सन्मान करण्यात आला. यात जिल्हा उपाध्यक्ष- नाना लामखेडे, जिल्हा प्रधान सचिव- प्रल्हाद बो-हाडे, जिल्हा महिला विभाग कार्यवाह सुशीला चौधरी, जामनेर शाखा प्रधान सचिव बी. आर. पाटील यांच्यासह युवराज अहिरे, देहदान संकल्पबाबत संतोष जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन राजेश्वरी राजपूत केले. आभार बी. आर. पाटील यांनी मानले. प्रसंगी जिल्हा पदाधिकारी सुशीला चौधरी यांचेसह शाखेतील ॲड. राजू मोगरे, डॉ. मोहिनी मोरे, रितेश मोरे, रमेश पाटील, संदिपकुमार बाविस्कर, युवराज अहिरे, रमेश गायकवाड, जानकोजी पाटील, रामदास सोनवणे, तीर्थराज सुरवाडे, सुनंदा सोनवणे, संतोष जाधव, हरी पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.