जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील मास्टर कॉलनी येथे बंद घरातून दागिने आणि रोकड असा ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपींना ३ ऑगस्ट रोजी रात्री मास्टर कॉलनी आणि तांबापुरा परिसरातून अटक केली आहे. तिघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
मास्टर कॉलनी येथे मेहरुन्नीसा शेख नियाजोद्दीन (वय-५६) कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. २८ जुलै रोजी सकाळी त्यांचा मुलगा आणि सून नगरदेवळा गावाला गेले होते. मेहरुन्नीसा शेजारी राहणाऱ्या पुतण्याकडे रात्री झोपण्यासाठी गेल्या होत्या. अज्ञात चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत बंद घर फोडून २० हजार रुपयांची रोकड, सोन्याचे टॉप्स, मंगळपोत असा ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील संशयित आरोपी तांबापुर आणि मास्टर कॉलनीत असल्याची गोपनीय माहिती पो नि प्रताप शिकारे यांना मिळाली. सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, पो ना सुधीर सावळे, इमरान सैय्यद, मुदस्सर काझी, जमीर शेख, सचिन पाटील, साईनाथ मुंडे यांनी इश्तीयाक अली राजीक अली (वय-१९), सलीम उर्फ सल्या शेख कय्यूब (वय-२६) आणि सरजील सैय्यद हरून सैय्यद (वय-२६) या तीन जणांना अटक केली तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील आणि पो.ना. सचिन पाटील करीत आहेत.