जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात हॉटेल तनय रेस्ट्रो बारचा शुभारंभ नुकताच करण्यात आला आहे . गोदावरी कॉलेज समोर, महाजन डिजेलच्या बाजुला, एम.आय.डी.सी. नशिराबाद रोड या भागातील तनय रेस्ट्रो बारच्या शुभारंभप्रसंगी सत्यनारायण पूजा व स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
२ ऑगस्टरोजी राजकुमार लोटवाणी , अभिषेक पाटील, विष्णु भंगाळे व ललित चौधरी यांच्या हस्ते हॉटेल तनय रेस्ट्रो बारचा शुभारंभ करण्यात आला . याप्रसंगी प्रमुख पाहुणे:म्हणून योगेश पाटील (पिंटूशेठ) , भरत कोळी , ललित कोल्हे , लालचंद पाटील , परेश दिलीप कोल्हे , सागर भंगाळे , रुपेश कोल्हे , प्रविण कोल्हे , डॉ. विरन खडके , सुनिल खडके , प्रदिप रोटे , नंदु पाटील उपस्थित होते . पंकज बोरोले व विशाल काळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले .