यावल (प्रतिनिधी) – तालुक्यातील किनगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला वैद्यकीय अधिकारी यांच्या शासकीय निवासस्थानात तथा घरात बेकायदा प्रवेश करून त्यांच्याशी लज्जास्पद कृत्य केले व शासकिय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपावरून २ जणांसह त्यांच्या ३५ साथीदारांविरुद्ध यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नुसार दि ३० जुलै रोजी गुरुवारी सायंकाळी १९.१५ वाजेच्या सुमारास किनगांव खु. (ता. यावल) ग्रामपंचायतचे उपसरपंच शरद अडकमोल, दामू सिताराम साळुंके व त्यांची पत्नी , २ मुली , इतर ३५ लोक (सर्व राहणार किनगांव) यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा महाजन राहते घरात ( सरकारी क्वार्टर्स ) मध्ये बेकायदा प्रवेश करून डॉ. महाजन यांना लज्जा वाटेल अशा नजरेने पाहुन डिलिव्हरी पेशंटला घेऊन जाण्यासाठी ॲम्बुलन्स वाहन द्या असे बोलला असता डॉ. महाजन यांनी सांगितले की तुम्ही आधी घराबाहेर चला मी ड्रायव्हरला फोन करते असे म्हटल्याने तो घराबाहेर गेला व बोलला की थांब तुला दाखवतो. माझे मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले व त्यास मी हटकले असता त्याने त्याच्या सोबत सिताराम साळुंके व त्याची पत्नी, २ मुली , इतर ३० ते ३५ लोकांना दवाखान्यात आणून शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. यांच्या विरूध्द किनगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा लालचंद महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पो. स्टे. भाग-५ गुन्हा र.नं. २९ / २०२० कलम ३५३, ३५४, A १( १) ४५२ , ३५१ , १४३, १४७, १४९, २९४ , ५०४ , ५०६ , १८६, १३५ प्रमाणे उपसरपंच शरद अडकमोल, दामू सिताराम साळुंके व त्यांची पत्नी , २ मुली , इतर ३५ लोकांविरुद्ध दि. ३१ जुलै २०२० शुक्रवार रोजी पहाटे ०२.२३ वाजता यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या आदेशान्वये पी.एस.आय. जितेंद्र खैरनार हे करीत आहेत. या घटने मुळे यावल तालुक्यात खळबळ उडाली आहे.