मुंबई (वृत्तसंस्था) – दि.१८ जूले शनिवार रोजी “ओंनलाईन गुगल मिंट” वेबनार “जन्मबंध व्हाट्सएप” ग्रुपच्या माध्यमातून “स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन सत्र आणिं कौतुक सोहळा” चे आयोजन (मुंबई, नासिक, ऑरंगाबाद, घुळे, जळगांव आणि इ.जिल्हे) ओंनलार्डन घरी बसून विद्यार्थी व पालकांसाठी आयोजित करण्यात आले होते. “ऑनलाईन गुगल मिंट वेबनार” चे मुख्य आकर्षक होते सुवर्णकार समाजाचे भूषण नांदेड- वाघाळा महानगरपालिकेत ‘सहाय्यक आयुक्त’ आणि ‘उपजिल्हाधिकारी’ या पदावर नियुक्ती झालेल्या “सुवर्ण कन्या, कु. श्रद्ा बबनराव उदावंत”. कार्यक्रमाची सुरुवात समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिंरोमणी नरहरी महाराज यांच्या ध्वनी चित्रफित “देवा तुझा मी सोनार” या गीताने झाली. यानंतर ऑनलाईन वेबनारचे प्रास्ताविक “जन्मबंध “चे कार्यकारी अँडमिन श्री सुनील विभांडिक(बदलापूर) यांनी केले. “जन्मबंध व्हाट्सएप ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष श्री प्रभाकर मोरे साहेब यांनी या कार्यक्रमात सुवर्णकन्येचा थोडक्यात परिचय करुन दिला. कु.श्रद्धा बबनराव उदावंत तसेच वडील औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध सराफ व्यापारी (कल्याण ज्वेलर्स, औरंगाबाद) श्री बबनराव उदावंत यांची सुकन्याआहे. त्यांनी औरंगाबाद शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.ई. कांम्पूटरची पदवी संपादन केली.


यानंतर श्री सुनील विभांडिक(बदलापूर) यांनी उपस्थिंत पाहुण्यांचे शब्द सुमनांनी स्वागत केले आणि थोडक्यात सुवर्ण कन्या यांचा शैक्षणिक अल्प परिचय करुन दिला. महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची (एमपीएससी) तीन वेळा परीक्षा दिली. २०१७ च्या एमपीएससीच्या परीक्षेत यशस्वी झाल्यामुळे त्यांची नांदेड महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून नेमणूक झाली. सन २०१५ च्या एमपीएससीच्या परीक्षेत कु. श्रघ्दा मेंडम यांनी नेत्रदीपक यश संपादन करुन महाराष्ट्रात मुलींमधून चौथा क्रमांक तर ओबीसी उमेदवारांमधून हितीय क्रमांक मिळवून यशाचे शिंखर गाठले .आता त्यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेली आहे. या त्यांच्या यशामागे त्यांची आर्ड वडीलांचा आशीर्वाद आणि गुरुजन वर्गाचे लाखमोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. यानंतर सर्वाना उत्सुकता होती ती प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड-वाघाळा महानगरपालिका चे सहाय्यक आयुक्त ,सुवर्णकन्या कु. श्रद्धा बबनराव उदावंत यांचे मनोगत ऐकण्याची. कु.श्रद्धा उदावंत मॅडम आपल्या मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या कि, स्पर्धा परीक्षा विषयीचे मार्गदर्शन यामध्ये विद्यार्थ्यानी एमपीएससीच्या परीक्षेची तयारी कशी करावी? प्रवेश प्रक्रिया कशी असते? अभ्यासक्रमविषयी मार्गदर्शन उमेदवारांची मुलाखत त्याचे कौशल्य. अभ्यास किती वेळ करावा? स्पर्धा परिक्षेला क्लासेसची गरज आहे का? या अनेक विषयीचे मार्गदर्शन केले. शिंक्षण फक्त नोकरी व पैसा मिळवण्यासाठी न करता स्वत:ची प्रतिमा उजळण्यासाठी, स्वत:च्या समाधानासाठी करावी. अपयशाने खचून न जाता स्वत: पुन्हा प्रयत्न करा, आध्यात्मिक पुस्तके वाचा असा सल्ला समाजबांधवांना दिला. आपल्या झालेल्या चूकातून शिंकता येते आणि यशस्वी ही होता येते. मुळात स्पर्धा परीक्षेत तीव्र स्पर्धा असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याने प्लॅन ‘बी”तयार ठेवावा. चालू घडामोडींवर नेहमी लक्ष असू द्यावे. संदर्भासाठी सोशल मिंडियापेक्षा पुस्तकात पहावे. अभ्यासात सातत्य असावे.
अभ्यास करतांना होणार्या पुकांवर काम करावे, कमजोर विषयावर जास्त लक्ष द्यावे. यावेळी त्यांनी तरुणांना उद्देशून सांगितले की,
“आपले हात आकाशाला नाही पोहचले तरी चालेल, पण पाय जमिनीला टेकू द्या” हे गौरवोद्रार यावेळी काढले. आपले स्वत:चे पाय
जमिंनीवर आहे हे त्यांनी सिंध्द केले. यावेळी अनेक मान्यवरांच्या शुभेच्छा स्विकारल्या. “जन्मबंधचे ‘कार्यकारी अँडमिन श्री सुनील
विभांडिक यांनी कु.श्रद्धा मॅडम यांच्या विषयी सांगितले कि,भविष्यात सुध्दा त्यांचा प्रयत्न, चिकाटी,शांत ,स्वभाव, अभ्यासू वृत्ती, या गुणांच्या बळावर व स्वत:ची कर्तृत्वाची यशाची उंच शिंखरे गावतील. असा हा यशस्वी तेचा औरंगाबादपासून सुरु झालेला प्रवास यामध्ये बालपण, शिंक्षण, स्पर्धा परीक्षा, सहाय्यक आयुक्त ते उपजिल्हाधिकारी पदापर्यंत करत आपल्या मेहनतीने, चिकाटी, अथांग परिश्रम, जिद्द या जोरावर त्यांनी यशाचा टप्पा गाठला. याचा सर्व सुवर्णकार समाज बांधवांना तसेच आजच्या युवापिढीसाठी आदर्श राहील. तसेच जन्मबंध ग्रुपचे कार्यकारी अँडमिन श्री महेंद्र सोनार(घुळे) यांनी संपूर्ण सुवर्णकार समाज बांधवांतर्फे त्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात दिल्या.त्याच प्रमाणे कु. श्रद्धा मॅडम यांच्या वडिलांसह अनेक नातेवाईकांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी महाराष्ट्र मध्यप्रदेश, गुजरात या तिन्ही राज्यातील दोनशेहून अधिंक समाज बांधव आप आपल्या घरी बसून वेबनार कार्यक्रमात सहभागी झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनील हिरालाल विभांडिक (बदलापूर)यांनी केले.







