जळगाव (प्रतिनिधी) – कोविड 19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता आज न्हावी ता.यावल येथे कोविड 19 चे रुग्ण शोधण्याकरीता वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिषेक ठाकुर यांनी आर.टि.पी.सी.आर. टेस्ट करुन तपासणी शिबीर घेतले.डॉ.अभिषेक ठाकुर यांनी संबधित नागरीकांचे घशाचे स्वैब घेऊन डॉ.राहुल चौधरी यांनी स्वैब कलेक्शन करीता मदत केले.


सदरील कोविड 19 तपासणी शिबीरास, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हेमंत बऱ्हाटे, यावल ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.व्ही.बी.बारेला, आरोग्य सहाय्यक श्री.अशोक तायडे, आरोग्य सहाय्यक श्री.घनश्याम डोळे, आरोग्य सेवक श्री. विलास महाजन, एल.एस.ओ. श्री.संदिप गाडेकर , ए.एन.एम. श्रीमती के.टि.पाटिल, श्री.कैलास कोळी, न्हावी ग्रा.पं.चे सरपंचांचे पती श्री.नितीन चौधरी, ग्रा.पं.सदस्य श्री.दिलीप महाजन, पोलिस पाटिल श्री.संजय चौधरी उपस्थित होते.








