आळंदी (वृत्तसंस्था) – आज रोजी ३१ऑक्टोबर भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल ,यांच्या जयंती लिमित्त आपल्या आळंदी येथील समाज भवनात साजरी करण्यात आली.

या निमित्ताने प्रमुख पाहुणे ह भ.प. नरहरी महाराज चाैधरी (महाराष्ट्र वारकरी परिषद सचिव व ज्ञानेश्वर महाराज कमिटीचे विश्वस्त) व तसेच अ.भ.देवसेनेचे पदाधिकारी महेंद्र पाटील (वरगव्हान), उपप्रदेश अध्यक्ष ह.भ.प.पुरूषोत्तम महाराज पाटील ( प्रदेश युवा सहसमन्वय महाराष्ट्र ), संजय चव्हाण ( सहसंयाेजक पुणे जिल्हा गुजर देवसेना) , विकास चौधरी (तोंदे) युवा सचिव पुणें जिल्हा, प्रवीण पाटील (घाडवेल), कार्यकारी अध्यक्ष सुरेश पाटील (वेलेकर), उमेश पाटील (तावसेकर), कैलास पाटील (वडीर्कर), कपील पाटील (आव्हाणेकर) इ. समाज बांधव हजर होते

अखिल भारतीय गुर्जर देवसेना (महाराष्ट्र) संघटनेच्या माध्यमातून आळंदी येथे मा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने “प्रतिमेचे पूजन करून सरदार साहेबाच्या कार्याची सर्व देशाला दिलेली एक नावा प्रमाणे दिशा त्यांचा व्यक्तीमत्वाबद्दल चर्चा करण्यात आली. आणि प्रमुख पाहुणे यांनी त्यांचे विचार आम्हा सर्वांना सांगितले.







