माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्द्घाटन

जळगाव (प्रतिनिधी) – आज महर्षी वाल्मिक जयंती निमित्त, वाल्मिक नगर, जैनाबाद परीसर जळगाव येथे महर्षी वाल्मिक तरुण सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते आद्य कवी महर्षी वाल्मिक यांच्या पुतळ्याला माल्यार्पन करुन , रक्तदान शिबिराचे उद्द्घाटन करण्यात आले.
सदरील कार्यक्रमास महर्षी वाल्मिक तरुण संस्कृतीक मंडळाचे कार्यकर्ते तसेच माजी नगराध्यक्ष चत्रभूज आबा सोनवणे, नगरसेवक अशोक लाडवंजारी, नगरसेवक किशोर बाविस्कर, नगरसेवक सुनिल माळी, चंदन कोल्हे , राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे, डॉ.अभिषेक ठाकुर, निलेश तायडे, शुभम तायडे, सुकलाल तायडे, मुन्ना पेहेलवान, निंबा सोनवणे, किशोर सोनवणे, भगवान सोनवणे, समाधान सोनवणे, अक्षय सोनवणे, अनिल कोळी, रितिक कोल्हे, कमलेश सपकाळे, पंकज सोनवणे, आकाश रायसिंग, विजय सपकाळे, पंकज बाविस्कर आदी उपस्थित होते.







