जळगाव ( प्रतिनिधी ) – जून महिन्यात जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान ११ शोध मोहीम पोलीस राबवणार आहेत अशी माहिती आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून देण्यात आली .
सर्वोच्च न्यायालय व केंद्रीय गृह मंत्रालय, महीला बाल अत्याचार प्रतिबंध विभाग यांचे आदेशान्वये हरविलेल्या बालकांसंदर्भात ऑपरेशन मुस्कान ११ ही शोध मोहीम १ ते ३० जून या कालावधीत जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे , पोलीस उप अधीक्षक (गृह) व स पो नि योगिता नारखंडे यांचेसह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष विभागातील पोलीस अंमलदार राबवणार आहेत त्यासाठी केशवस्मृती प्रतिष्ठाणचा समतोल प्रकल्प यांचे सहकार्य आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील हरविलेल्या व सापडलेल्या बालकांची माहीती विहीत नमुन्यात डाटा बेस तयार करून WWW.TRACKTHEMISSINGCHILD.IN या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुलांचे आश्रयगृह, अशासकीय संस्था, रेल्वे स्थानक, बस स्थानक, रस्त्यातील भिक मागणारी अथवा वस्तु विकणारी मुले अथवा कचरा गोळा करणारी मुले, धामीक स्थळे, रुग्णालय, हॉटेल, दुकाने इत्यादी ठिकाणी काम करणारी मुले अशा मुलांना हरविलेली मुले समजुन त्यांचे फोटो घेवून त्यांची अद्यायावत माहीती तयार करण्यात येणार आहे या कालावधीत सापडलेल्या मुलांची माहीती घेवून त्यांचे आई-वडील , त्याचे कायदेशिर पालक याचेकडे सुपुर्द करण्यात येणार आहे वेळोवेळी अशा मूलांची छायाचित्र प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्धीस देण्यात येणार आहेत. हरविलेल्या जास्तीत जास्त बालकांचा शोध घेण्यात येवून त्याचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. ही मोहीम जिल्ह्यात सर्व पोलीस ठाण्यामार्फत राबविण्यात येणार आहे.
या ऑपरेशन मुस्कान ११ या मोहीमेस शासकीय, अशासकीय सामाजिक संस्था मदत करण्यास इच्छुक असल्यास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, कार्यालयास संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केले आहे .