• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

अबब, महिलेच्या पोटातून काढला साडेसात किलोचा गोळा !

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाला यश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 31, 2023
in Uncategorized
0

लहानपणी हृदय शस्त्रक्रिया तरीही शल्यचिकित्सा विभागाने स्वीकारले होते आव्हान

जळगाव (प्रतिनिधी) – पोटामध्ये असलेल्या मोठ्या गोळ्यामुळे जीवन जगणे मुश्किल झालेल्या एका महिलेला जिवंतपणे होत असलेल्या त्रासातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागातील वैद्यकीय पथकाने गुंतागुंतीचे ऑपरेशन करून मुक्त गेले. विशेष म्हणजे सदर महिलेची लहानपणी ह्रदय शस्त्रक्रिया झालेली होती. ही जोखीम पत्करूनही वैद्यकीय पथकाने त्यांचे कौशल्य पणाला लावले आणि महिलेला दिलासा दिला. सदर महिलेला अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांच्या उपस्थितीमध्ये रुग्णालयातून निरोप देण्यात आला.

याबद्दल अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांनी शल्यचिकित्सा विभागाचे कौतुक केले आहे.

जामनेर तालुक्यातील गोद्री येथील दीपाली गोपाळ यांचेवर लहानपणी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. गेल्या वर्षभरापासून तिच्या पोटामध्ये सारखे दुखत होते. नंतर पोटामध्ये गोळा असल्याचे निदान झाले होते व दिपाली गोपाळ हिच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यांच्यासह कुटुंबियांनी शस्त्रक्रिया करण्याची अपेक्षा सोडून दिली होती.

अशातच त्यांच्या गावात मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शिबिर लागले आणि त्यांच्या आशेमध्ये वाढ झाली. शिबिरात शल्य चिकित्सा विभागाच्या टेबलवर त्यांची समस्या माहीत झाल्यावर त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येण्यासाठी सांगण्यात आले. तेथे शस्त्रक्रिया होईल आणि खर्च देखील लागणार नाही याची हमी घेण्यात आली.

त्यानुसार दिपाली गोपाळ या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय जळगाव या ठिकाणी दाखल झाल्या होत्या. तपासणीनंतर त्यांच्या पोटातील गाठ ही आतड्याची गाठ असल्याचे निदान झाले. शल्यचिकित्सा विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रशांत देवरे यांनी तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

शस्त्रक्रिया केल्यानंतर दिपाली गोपाळ हिच्या पोटातून साडेसात किलोचा गोळा काढण्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया वैद्यकीय पथकाने यशस्वी केली. वर्षभरापासून गाठ असल्यामुळे शरीरातील इतर अवयव दाबले गेले होते. सोबतच हृदयाचे दुर्धर आजाराची आधीच शस्त्रक्रिया झालेली असल्याने कमी वेळेत आणि कमीत कमी रक्तस्त्राव होईल अशा पद्धतीने ही शस्त्रक्रिया करायची होती, ती यशस्वी झाली.

शस्त्रक्रिया करण्याकामी शल्य चिकित्सा विभागाचे प्रमुख तथा उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. समीर चौधरी, डॉ. ईश्वरी गारसे, डॉ. विपिन खडसे, डॉ. स्नेहा वाडे, डॉ. जिया उल हक यांच्यासह भुल शास्त्र विभागाचे डॉ. संदीप पाटील, डॉ. ऋतुराज काकड, इन्चार्ज परिचारिका नीला जोशी यांच्या पथकाने परिश्रम घेतले. सदर महिलेला अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये रुग्णालयातून निरोप देण्यात आला.


 

Tags: #jalgaon civil hospital #maharashtrahttps://kesariraj.com/31-may-23-n-15/
Previous Post

सुरीने वार करून शिवीगाळ ; रेल्वे स्टेशन परिसरातील घटना

Next Post

पादुका चोरी करून लपून बसला, सतर्क पोलिसांनी मात्र त्याला शोधूनच काढला !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पादुका चोरी करून लपून बसला, सतर्क पोलिसांनी मात्र त्याला शोधूनच काढला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon