जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील सिंधी कॉलनी परिसरात राहणाऱ्या महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील सिंधी कॉलनी परिसरात २६ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे.शनिवार ३० जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास रौनक रामकुमार कुकरेजा याने महिलेला फोन करून त्याच्या घरी काम असल्याचे सांगून घरी बोलावले. घरात कुणीही नसल्याचा फायदा घेत महिलेशी अंगलट करत हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला. महिलेने तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री ११.३० वाजता संशयित आरोपी रौनक रामकुमार कुकरेजा याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रदीप पाटील करीत आहे.