• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

इटलीमध्ये इस्रायली दूतावासाशेजारी देखील सापडला बॉम्ब – सूत्र

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 31, 2021
in भारत, विश्व
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – शुक्रवारी राजधानी दिल्लीमध्ये इस्रायल दूतावासाच्या बाहेर झालेल्या स्फोटा नंतर अनेक प्रकारची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या तपास यंत्रणांशी संबंधित सूत्रांनी दावा केला आहे की हा हल्ला अत्यंत नियोजित पद्धतीने करण्यात आला आहे. असे म्हटले जात आहे की हा एक कोऑर्डिनेटेड हल्ल्याचा प्रयत्न होता, म्हणजे एकाच वेळी एकापेक्षा जास्त ठिकाणी हल्ला करण्याचा कट होता. त्याचा खरा हेतू म्हणजे भय निर्माण करणे हा होता. खरं तर, ज्या दिवशी दिल्लीतील दूतावासाच्या बाहेर हा स्फोट झाला त्याच दिवशी इटलीमध्ये देखील इस्त्रायली दूतावासाच्या बाहेर बॉम्ब सापडला.

दिल्लीत गेल्या 9 वर्षात दुसऱ्यांदा इस्त्रायली दूतावासाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला गेला. 2012 मध्ये दूतावासाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात इस्त्रायली मुत्सद्दी जखमी झाले होते. विशेष म्हणजे त्यावेळीही दहशतवाद्यांनी दोन इस्रायली दूतावासांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. ज्या दिवशी इस्त्रायली मुत्सद्दीच्या गाडीवर हल्ला झाला होता, ठीक त्याच दिवशी जॉर्जियातील इस्रायली दूतावासाच्या बाहेर देखील बॉम्ब सापडला होता.

इस्त्रायली मुत्सद्दी तेल येहोशुआ आणि भारताचे वाहन चालक या स्फोटात जखमी झाले होते. हा एक मॅग्नेटिक स्फोट होता. त्यावेळीही इस्रायलने या हल्ल्यासाठी इराणला जबाबदार धरले होते. आता पुन्हा एकदा हल्ल्याचा संशय इराणकडे जात आहे. विशेष म्हणजे या वेळीही दोन इस्रायली दूतावासांना लक्ष्य केले गेले आहे.

लक्षात घेण्यासारखे आहे की एक खास दिवस असल्याकारणाने हा हल्ला या दिवशी घडवून आणण्यात आला होता. भारत-इस्राईल मुत्सद्दी संबंधांच्या 29 व्या वर्धापनाच्या दिवशी हा हल्ला करण्यात आला. अशा परिस्थितीत या हल्ल्यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार दूतावासाशेजारी झालेल्या बॉम्बस्फोटानंतर तातडीने तीन आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स देखील थांबविण्यात आल्या होत्या. कसून शोध घेतल्यानंतरच या फ्लाईट्सना जाण्यास परवानगी देण्यात आली होती. काही माहितीच्या आधारे या फ्लाईट्सची देखील चौकशी करण्यात आली होती.

फॉरेन्सिक तपासणीत सध्या समोर आले आहे की स्फोटात पीईटीएनचा वापर केला गेला. जगभरातील लष्करालाच फक्त याचा वापर करण्याची परवानगी आहे. तपासणीत एक ‘हाय-वॅट’ बॅटरीही सापडली आहे. 9 व्होल्टच्या या बॅटरीचा उपयोग सामान्यत: रेडिओ ट्रान्झिस्टरसाठी केला जातो, जेणेकरून स्फोटाच्या जागेवरुन संदेश पाठवता येतील. सूत्रांचे म्हणणे आहे की इस्लामिक स्टेट किंवा अल कायदाचा देखील यामध्ये हात असू शकतो.


 

 

Previous Post

जळगावात घरफोडी ; दोन लाखांचा ऐवज लंपास

Next Post

मणिपूर येथे हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील जवान शहीद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मणिपूर येथे हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील जवान शहीद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon