मुंबई (वृत्तसंस्था) – कंगना नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांवरून चर्चेत असते. ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करुन वारंवार वादग्रस्त विधानं करणाऱ्या कंगनावर ट्विटरने तात्पुरते निर्बंध आणले आहेत. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा तिने ट्विटरवर कंगवा केला आहे. आता कंगनाने नथुराम गोडसेचे समर्थन केले आहे.

दरम्यान, 30 जानेवारी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला तिने नथुराम गोडसेबद्दल एक ट्वीट केले. तिने ट्विट केले आहे की,’ सर्व कथांमागे तीन बाजू असतातच. एक माझी, एक तुमची आणि एक खरी. चांगला माणूस कथा सांगतांना बंधनात नसतो न तो कधीच काही लपवितो म्हणूनच आपली पाठ्यपुस्तके उपयोगीची नाहीत. पूर्णपणे प्रदर्शन करणारी…’, असे कंगनाने ट्वीट केले असून नथुराम गोडसेचे फोटो सुद्धा पोस्ट केलेत.
तिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती ‘थलायवी’ आणि ‘धाकड’ सिनेमात दिसणार आहे. याशिवाय ‘तेजस’ या सिनेमातही ती मुख्य भूमिका साकारणार आहे. तसेच ती चित्रपटात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.







