स्व.निखिल खडसे यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळी जागविल्या आठवणी

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – स्व निखिल एकनाथराव खडसे यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या स्मृतीस स्व निखिल खडसे स्मृतीस्थळ ,आदिशक्ती मुक्ताई सह सुतगिरणी मुक्ताईनगर येथे अभिवादन करण्यात आले. जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांच्या हस्ते स्व निखिलभाऊ खडसे यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले
यावेळी स्व निखिल खडसे यांच्या स्मृतीला उजाळा देत रोहिणी खडसे म्हणाल्या स्व निखिल दादा यांनी त्यांच्या जि प सदस्य काळात भरपूर विकास कामे केली, त्याचबरोबर युवकांचे संघटन उभारले आज राज्यात कुठेही गेलो तरी त्यांच्या मित्र परिवारातील सदस्य भेटतात व स्व निखिल भाऊ यांची आठवण काढतात.
एकनाथराव खडसे यांनी स्थापन केलेल्या मुक्ताई सूतगिरणीचे काम पूर्णत्वास जाऊन सूतगिरणी सुरू व्हावी व स्थानिक युवकांना महिलांना रोजगार मिळावा हे निखिल भाऊंचे स्वप्न होते, त्यासाठी ते सूतगिरणीचे चेअरमन झाल्यावर त्यांनी सूतगिरणीचे काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला परंतु काळाने निखिलदादाला आपल्यातुन हिरावून नेले, तदनंतर निखिल दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्यातून मी सूतगिरणीचे काम पूर्णत्वास नेले आज सूतगिरणी सुरू असून सुमारे 250 युवक, महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. लवकरच सूतगिरणीच्या चात्यात वाढ करण्यात येणार आहे त्यातून आणखी लोकांना रोजगार उपलब्ध होईल हि निखिल भाऊंना खरी श्रद्धांजली ठरेल. भविष्यात जिनिंग, धागा निर्मिती ते कापड निर्मिती सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे असे रोहिणी खडसे म्हणाल्या.
यावेळी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील,जि. प. सदस्य निलेश पाटील,रामदास पाटील, मधुकर राणे,ईश्वर रहाणे,प्रा. सुनिल नेवे, राजुभाऊ माळी, विलास धायडे, सुभाष पाटील, दशरथ कांडेलकर, सूतगिरणी उपाध्यक्ष संजय चौधरी, अतुल झांबरे, सुधाकर जावळे, यु डी पाटील, शाहिद खान,योगेश कोलते, अतुल पाटील, कल्याण पाटील, प स सदस्य राजेंद्र सवळे,चंद्रकांत भोलाने, विनोद पाटील, प्रदिप साळुंखे,विनोद सोनवणे,नगरसेवक पियुष महाजन, निलेश शिरसाट, ललित महाजन, बापू ससाणे, आसिफ बागवान, प्रविण पाटील,मनोज तळेले,दिनेश नेमाडे पंकज सरोदे, सुनिल काटे, देवराम सुपे,रणजित गोयनका, सुशिल भुते, मयूर साठे, राजेश ढोले, मुन्ना बोडे, प्रविण दामोधरे, सुमित ब-हाटे,पृथ्वीराज पाटील,प्रदीप बडगुजर, आनंद माळी, शिवराज पाटील, विकी मराठे, शुभम मुर्हेकर, शुभम चौधरी, कैलास कोळी, राजेंद्र पाटील,शिवा पाटील, संजय तितुर, डी एम जगताप, पुरुषोत्तम बढे, पांडुरंग नाफडे उपस्थित होते.







