धरणगाव ( प्रतिनिधी ) – धरणगाव शहरातील रामकृष्ण नगरातून वृध्दाची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत धरणगाव पोलीस स्टेशनला शुक्रवारी ३० डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नामदेव पितांबर महाजन (वय-६०) रा. लहान माळीवाडा, धरणगाव हे आपल्या परिवारासह राहायला आहे. १६ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता ते त्यांची दुचाकी (एमएच १९ एसी २४०२) ने एरंडोल रोडवरील रामकृष्ण नगर येथे जावई यांच्या घरी आले होते. त्यावेळी त्यांनी दुजाकी पार्किंगला लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने २० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून येण्याचे उघडकीला आले. त्यांनी परिसरात दुचाकीचा शोध घेतला दुचाकी न मिळाल्याने अखेर धरणगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी ३० डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नाना ठाकरे करीत आहे.