पारोळा ( प्रतिनिधी ) – पोलीस असल्याची बतावणी करून ट्रकचालकाला पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून दोन मोबाईल व रोकड चोरल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एकाला अटक केली असून दुसरा फरार झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, देवाशीष श्यामपद दत्ता (वय-४४) रा. कालघाट, पश्चिम बंगाल हे ट्रक क्रमांक (डब्ल्यूबी २५ एल २९९९) यामधून लोखंडीचे बार घेऊन ओरिसा ते गुजरात येथे जाण्यासाठी पारोळामार्गे निघाले होते. पारोळा गावाजवळील हॉटेल सहयोगच्या पुढे एका स्प्लेंडरवर दोन जण येऊन ट्रक समोर आडवी केली. आपण पोलीस असल्याची बतावणी केली. त्यावेळेस ट्रकचालक देवाशिष दत्ता यांनी ट्रक बाजूला करून खाली उतरले. ट्रकचालकाला दोघांनी पिस्तुल्यासारखे टोकदार वस्तूचा व चाकूचा दाखवून त्यांच्या जवळील २ मोबाईल व रोकड असा एकूण १० हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जबरी काढून पसार झाले. ही घटना ३० डिसेंबर रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला संशयित आरोपी शाहरुख अब्बास खाटीक (वय-२६) रा. चाळीसगाव आणि सरफराज अमीन अन्सारी रा. धुळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांपैकी शाहरुख खाटीक याला पारोळा पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करीत आहे.