जळगाव (विशेष प्रतिनिधी)- जळगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक देविदास कुनगर हे आपल्या पथकासह भुसावळहून जळगावकडे येत असतांना शहरातील कालीकांमाता मदीरापासून समोरून स्वीप्ट गाडीमध्ये सराईत गुन्हेगार आकाश सपकाळे व जगदीश सपकाळे दिसताच पोलीसांनी दोघांना ओळखताच आरोपींनी कार सुसाट वेगाने पळविताच चोर पोलीसांचा खेळ सुरू झाला आणि अखेर पोलीसांनी दोघांच्या मुसक्या आवळत त्यांना ताब्यात घेतल्याची घटना दि.30 रोजी रात्री घडली.यावेळी त्यांच्याजवळ गावठी बनावटीचा कट्टा व चॉपरही पोलीसांनी जप्त केले आहे.
सविस्तर वृत्त असे की,शहर वाहतूक पोलिस निरीक्षक देविदास कुनगर हे पोलीस कर्मचारी संदीप पाटील व योगेश पाटील हे जिल्हा रात्रीची गस्तच्या कामामुळे भुसावळ पोलीस स्टेशनला भेट देवून जळगावला येत असातांना त्यांना शहरातील कालीकांमाता मदीरापासून समोरून स्वीप्ट गाडीमध्ये सराईत गुन्हेगार आकाश सपकाळे हा स्वीप्ट गाडी चालवित असतांना पोलीसांनी त्याला ओळखताच आकाशने कार सुसाट वेगाने जुना खेडी रोडजवळील ओंकार हॉटेल पासून गोपालपूरा,आंबेडकर नगर तेथून रथचौक व कोल्हे गोडावून अशी गाडी पळवित सुटला.मात्र कुंभारवाड्याच्या कोपर्यावर समोरून येणारा छोटा हत्ती टाटा मॅजिक गाडीला आकाशने स्विप्ट गाडीने धडक देताच त्याच ठिकाणी आकाशला पकडले. यावेळी चोर पोलीसांचा खेळ संपला आणि अखेर पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले.आकाशला विचारले असता उडवाउडवीचे उत्तरे देवू लागला असता त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याच्यासोबत जगदिश भगवान सपकाळे असल्याचे आकाशने सांगितले व त्याच्याकडून गावठी बनावटीचा कट्टा व चॉपर जप्त केले.याप्रकरणी शनिपेठ पोलीसात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.