पारोळा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील नागेश्वर येथे 1 जूनरोजी सकाळी तालुका भाजपकडून संकल्प मेळावा घेण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष आ राजू मामा भोळे , आ गिरीश महाजन, जन जाती प्रदेश अध्यक्ष किशोर काळकर ,पालक पदाधिकारी पारोळा तालुका माजी खा ए टी पाटील, तालुका प्रभारी महेश पाटील, तालुका अध्यक्ष ऍड अतुल मोरे यांच्यासह जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत
.या संकल्प मेळाव्यात येणाऱ्या जि प ,प स , नपा , बाजार समिती, दूध संघ आदीं निवडणुकाबाबत चर्चा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या 8 वर्ष पूर्ती निम्मित सेवा सुशासन पंधरवाडा राबविण्यात येणार आहे मेळाव्यास प्रमुख पदाधिकाऱ्यांना पक्षाची ध्येय धोरणे, शाखा निर्मिती, पक्ष संघटन या बाबत मार्गदर्शन केले जाणार आहे ,यावेळी पदाधिकारी यांनी उपस्थिती देण्याचे आवाहन माजी खा ए टी पाटील यांनी केले आहे.