जळगाव ( प्रतिनिधी ) – राज्यात कोविडचे वाढते रुग्ण व नव्या व्हेरिअनंटच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज जि प मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची बैठक साने गुरुजी सभागृहात घेण्यात आली.या बैठकीत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १०० टक्के लसीकरण ग्रामीण भागात पुर्ण करण्यासाठी १ ते १४ जूनदरम्यान घर दत्तक मोहीम राबविण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले .
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.टी. जमादार, जिल्हा महिला बालविकास अधिकारी देवेंद्र राऊत , शिक्षणधिकारी विकास पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे , जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी , सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते .ज्यानी कोरोनाचा पहिला किंवा दुसरा डोस अद्यापही घेतलेला नाही अशा नागरिकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने घर घर दत्तक मोहिमेच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य व अंगणवाडी कर्मचाऱयांच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करून लसीकरण मोहीम राबविण्याच्या सुचना देण्यात आल्या
.या मोहिमेत आरोग्य कर्मचाऱ्यासोबतच ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षक , आशा वर्कर यांनादेखील सहभागी करून घेऊन तालुकास्तरावर गटविकास अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांची समिती गठीत करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या . ५ वर्षांखालील बालकांचे मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने विशेष अतिसार पंधरवाडा राबविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने खेडोपाडी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या .