पुणे ( प्रतिनिधी ) – वीज कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यानंतर महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी फटाके फोडत आनंद साजरा केला. विविध मागण्यांसाठी मागचे दोन दिवस वीज कर्मचारी संपावर होते.
वीज कर्मचाऱ्यांची ऊर्जामंत्र्यांसोबत बैठक पार पडल्यानंतर संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली. ऊर्जामंत्र्यांच्या लेखी आश्वसनानंतर हा निर्णय घेण्यात आला.
बदली धोरणासंदर्भात घेतलेला एकतर्फी निर्णय मागे घेण्यात यावा, खासगीकरण, नोकरभरती यासह कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत ऊर्जामंत्री सकारात्मक पाहायला मिळाले. सूचना देऊन बदल करण्यात येईल, असे आश्वसन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले. चर्चा केल्याशिवाय बदली धोरण राबवले जाणार नाही तसेच कंत्राटी कामगारांना सुरक्षा देण्याबाबत चर्चाही या बैठकीत झाली. वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक सरकारी कार्यलये अंधारात गेली होती.