चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यात गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांच्या संकल्पनेतुन व गट शिक्षणाधिकारी विलास भोई यांच्या माध्यमातून शाळांसाठी B- plus अंतर्गत आयोजित उपक्रमाचे ( निपुण भारत ) उदघाटन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.
आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की , शिक्षकांच्या शिकवणुकीमुळे मला कधीही व्यसनाने शिवले नाही. शिक्षक समाजाचे खरे आदर्श असतात. तालुक्यात अनेक शिक्षक चांगल्या संकल्पना मांडत असतात.
पंचायत समिती शिक्षण विभाग व कृतिशील शिक्षण मंच यांच्या संयोजनाने तालुकास्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन राजपूत मंगल कार्यालय येथे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी नंदकिशोर वाळेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून विकास पाटील उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी विलास भोई व नंदकुमार वाळेकर यांनी बाल उपक्रम शाळेत कशा पद्धतीने सुरू आहे याची मांडणी केली आमदार शिक्षकांनी केलेल्या कामाने भारावले व दरवर्षी 50 लाख आमदार निधीतून शाळांसाठी देण्याची घोषणा केली.शाळेच्या भौतिक सुविधा सुधारणे कामी केव्हाही मदतीस तत्पर राहील अशी ग्वाही दिली.
गटविकास अधिकारी यांनी सांगितले की , अगदी शेवटच्या स्तरातील विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मॉडेलस्कूलमधून शिक्षण मिळण्याकामी तालुक्यातून प्रथम दोन शाळांनी पूर्तता केल्यानंतर पुढील टप्प्यात 50 टक्के शाळा परिपूर्ण होतील. प्रत्येकाच्या मानसिकतेला वळवण्याची कला माझ्यात आहे आणि ते मी प्रत्येक शिक्षकाकडून करून घेईल., असा विश्वास दिला.
भैय्यासाहेब वाघ यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी लक्ष्मण चव्हाण, महेंद्र सिसोदे, रामदेव राठोड, शिक्षण विभागाचे पंकज रणदिवे व कृतिशील शिक्षक मंच यांनी मेहनत घेतली.