जामनेर ( प्रतिनिधी ) – तोंडापूर शिवारातील शेतामध्ये बिबट्याने बैलावर हल्ला करून ठार केल्याची घटना २ दिवसांपूर्वी रात्री घडली त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत वाढली आहे
वनविभागाच्यावतीने काळे व शब्बीर पिंजारी यांनी पंचनामा केला . तोंडापूर परिसरात दुबार पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केल्याने व केळी , मकाचे पिकात पाण्याच्या आणि शिकारीच्या शोधात अजिंठा डोंगररांगमधील वन्यप्राणी मुक्त वावरत आहेत जामनेर रस्त्यावर दिवसा जाणाऱ्या गावकऱ्यांना बिबट्या आढळत असल्याच्या तक्रारी होत्या बऱ्याच दिवसापासून वावर असलेल्या बिबट्याने तोंडापूर शेजारी शेतकरी अंसार कय्युम पटेल याच्या गट क्रमांक २१९/२ या शेतात झाडाली बांधलेल्या जनावरांपैकी एका बैलावर रात्री हल्ला करून ५०० मीटर अंतरावर नेवून फडशा फाडला शेतात सकाळी गुडू पटेल गेले असता झाडाखाली बांधलेला बैल गायब असल्याचे लक्षात आले त्यांनी शेतात शोधले असता ओढत नेल्याच्या खुणा आढळल्या मग काढल्यावर मकाच्या शेतात मृत बैल व बिबट्याच्या पायाचे ठस्से दिसून आले
वनविभागाला माहिती देण्यात आली पंचनामा करण्यात आला याच शेतातून दोन दिवस अगोदर एक बकरी गायब झाली होती मात्र बकरीचे अवशेष आढळून आले नसल्याने पंचनामा करण्यात आला नाही तोंडापूर परिसरात कित्येक दिवसापासून दोन बिबट्याचा मुक्त संचार आहे शेतात मजुरांना बिबट्याचे दर्शन झाले आहे गावाच्या शेजारी शेतात बिबट्याने बैलावर हल्ला केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे अनुचित प्रकार घडु नये म्हणून जामनेर वनविभागाच्यावतीने बिबट्याच्या हल्ल्यापासून सरक्षंणासाठी उपाययोजना व जनजागृती करण्यात यावी अशी मागणी होत आहे.