भडगाव ( प्रतिनिधी ) – शहराला नियमित दररोज पाणीपुरवठा व्हावा या मागणीसह शहरातील अन्य समस्यांबाबत आज नागरिकांनी नगरपरिषद कार्यालयात निवेदन दिले .
भगवान रामराव पाटील ( रामकृष्ण नगर ) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिलेल्या या निवेदनात पुढे म्हटले आहे की , भडगाव शहर गिरणा नदीच्या डावीकडे व उजवीकडे या दोन भागात वसलेले आहे. एक पुल रहदारीसाठी सोडला तर दूसरा पादचारीसाठीदेखिल झालेला नाही. जो पुल आहे त्याचे देखिल आयुष्य संपलेले आहे. तो गिरणा नदिवरील पुल ब्रेक होउन मनुष्यहानी होण्याचे संभव आहे. त्याला समांतरपुल लवकर होउन इतर प्रस्तावित पुलांचे तातडीने
काम व्हावे. धुळे शहर किंवा अमलनेर शहर, येथे नदीवर एकाहून अधिक पुल आहेत. पिण्याचे पाणी गिरणा धरणातुन येउन वाहून जाते. नदित पाणी अडवीले जात नाही. पाचोरा नगरपारिषदसाठी ओझर येथे बंधारा बांधून 3० वर्ष झालीत. तातडीने दूसरी योजना सहा कोटीची बहुळा धरनावरुण पुन्हा मंजूर होउन. ते काम मार्गी लागले परंतु भडगावसाठी शासन बंधारा देखील मंजूर करीत नाही.
नाशिक शहर मोठे असूनही महानगरपलिकेकडून दररोज पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. भडगाव तालुक्यात देखील अनेक ग्रामपंचायतमार्फत दररोज पाणीपुरवठा होतो. गिरणा धरणात आजही 40 टक्के साठा आहे मात्र पाणीपुरवठा नियमित होत नाही २५ वर्ष झालीत तरी शहरात रस्त्यांचे डांबरीकरण झालेले माही, सर्व कामे शहराचे विकासासाठी महत्वाची असल्याने सहा महिन्याचे आत पूर्ण करावित भडगाव शहराचा विकास कामांचे अनुशेष त्वरित असून काढावा अन्यथा नागरिकांना आमारण उपोषण करण्याशिवाय पर्याय नाही. या निवेदनाच्या प्रति महसून आयुक्त व नगरविकास मंत्री यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.