• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कर्नाटकमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा पुढे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 30, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – एकीकडे महाराष्ट्रात ग्राम पंचायत निवडणुकीचे फॉर्म भरणे, पॅनल उभे करणे आदीची लगबग सुरु असताना शेजारील कर्नाटकमध्ये आज 5,762 ग्राम पंचायतींवर कोणाचे राज्य असणार य़ाचा निकाल सुरु झाला आहे. दोन टप्प्यांत झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून 81 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ही लढत चुरशीची होणार असल्याचे सांगितले जात आहे.

22 आणि 27 डिसेंबरला मतदान झाले होते. काँग्रेस, जेडीएसकडून सत्ताखेचून आणलेल्या सत्ताधारी भाजपाने दोन्ही विरोधकांना धोबीपछाड देत 80 टक्के ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेण्याची योजना बनविली होती. आजच्या निकालाच्या सुरुवातीच्य़ा कलानुसार 80 टक्के ग्रामपंचायती ताब्यात घेण्याचे दिसत नसले तरीही भाजपाच वरचढ ठरल्याचे दिसत आहे.

भाजपा 3,865, काँग्रेस 1,988 आणि जेडीएस 1,030 जागांवर पुढे आहे. सुरुवातीपासूनच भाजपाने मोठी उसळी घेतलेली आहे. राज्यात एकूण 6,004 ग्रामपंचायती आहेत. मात्र, कायदेशीर कारणांमुळे 242 ग्राम पंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. एकूण 94,348 जागांसाठी 2.8 लाख उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी सांगितले की, 85 ते 90 टक्के भाजप आणि समर्थक उमेदवार जिंकतील.
काही अपवाद वगळता निवडणूक शांततेत पार पडली होती. मात्र, ग्राम पंचायत सदस्य़ाची सीट मिळविण्यासाठी काही ठिकाणी उमेदवारांकडून २ ते 12 लाख रुपये देवस्थान, गावाच्या विकासासाठी देण्यात आल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. आज मतदान होत असले तरी निकाल उद्याच जाहीर होतील असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

गेल्या वर्षी झालेल्या सत्तासंघर्षात काँग्रेस, जेडीएसची सत्ता उलथवून भाजपाने मुख्यमंत्रीपद मिळविले होते. यामुळे ही ग्रामपंचायत निवडणूक तिन्ही पक्षांसाठी खूप महत्वाची होती. विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र, काँग्रेस, जेडीएसने एकत्र येत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले होते. अखेर काँग्रेस त्रास देत असल्याचे सांगत कुमारस्वामींनी अश्रू गाळले होते. यानंतर भाजपाने काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार फोडत नाराजीनाट्य घडविले होते. या आमदारांना मुंबईत आणून ठेवले होते.


 

 

Previous Post

महाराष्ट्रात ३१ जानेवारीपर्यंत निर्बंध कायम

Next Post

या निर्णयाचे जळगाव शहरातून जल्लोषात स्वागत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

या निर्णयाचे जळगाव शहरातून जल्लोषात स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
मुक्ताईनगरात ट्रकमधून ३४० लिटर डिझेल चोरी; ३४ हजारांचे नुकसान
Uncategorized

मुक्ताईनगरात ट्रकमधून ३४० लिटर डिझेल चोरी; ३४ हजारांचे नुकसान

July 30, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात व भक्तिभावाने साजरी
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुरुपौर्णिमा भक्तिभावाने साजरी

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon