मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना व्हायरस महामारीदरम्यान महाराष्ट्रात चांगलेच घमासान पाहायला मिळत आहे. सुरूवातीला सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणावर पक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक हाणामारी पाहायला मिळाली होती. तर आता शिवसेनेशी संबंधित नेत्यांवर तपास अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कारवाईने राजकारणात वादळ आणले आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत असलेले प्रकरण म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीकडून मिळालेली नोटीस. यावरून सध्या राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.

पीएमसी बँक घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून समन्स पाठवण्यात आले आहेत. यामुळे राऊत प्रचंड भडकले आहेत. ते विरोधकांवर चांगलीच जोर धरून टीका करत आहेत. ते सातत्याने भाजपला घेरत आहेत. तसेच मीडियावर निशाणा साधत आहेत. बुधवारी राऊतने आणखी एक ट्विट करत लिहिले की, माझ्या कुटुंबाला ईडीची नोटीस मिळाल्याची बातमी ऐकून काही मिनी कमळ फुलू लागले आहेत.
तपास अधिकाऱ्यांवर केंद्र सरकारकडून दबाव होत असल्याचा आरोप सातत्याने संजय राऊत करत आहे. त्यांनी या ट्विटमध्ये लिहिले की लोकांना माहीत आहे राजकीय बदला घेण्यासाठी पिंजऱ्यातले पोपट सोडून दिले आहेत. माझ्या कुटुंबाचे नाव चुकीच्या पद्धतीने पीएमसी आणि एचडीआयएल घोटाळ्याशी जोडले जात आहे.
आरोपांना चुकीचे सांगत संजय राऊत म्हणाले, मी आव्हान देतो की हे आरोप पुराव्यासह सिद्ध करा नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जा. इनफ इज इनफ. समझनेवाले को इशारा काफी है!
आपल्या या ट्विटमधून संजय राऊत यांनी आव्हान दिले आहे. या ट्वीटसोबत जय महाराष्ट्र लिहिले. या ट्विटमध्ये त्यांनी भाजप, किरीट सोमय्या आणि अमित शहा व्यतिरिक्त आपल्या पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आणि मंत्री आदित्य ठाकरे यांना टॅग केले आहे. किरीट सोमय्या सातत्याने या प्रकरणात ट्विट करत आहेत.
किरीट सोमय्याने आपल्या एका ट्वीटमध्ये आरोप केला की वर्षा संजय राऊत आणि माधुरी प्रवीण राऊस सिद्धांत सिस्कॉन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये डायरेक्टर्स होते. पीेमसी बँकेकडून एचडीआयएलमध्ये कोट्यावधी रूपये ट्रान्सफर करण्यात आले. सोमय्याने आपल्या एका ट्वीटमध्ये असा दावा केला की एचडीआयएलने पीएमसी बँकेचे ५४०० कोटी रूपये हडपले आहे आणि यातील एचडीआयएलने प्रवीण राऊत यांच्या कंपनीला १०० कोटी रूपये दिले आहे. सोमय्या म्हणाले, संजय राऊत यांचे कुटुंब प्रवीण राऊत यांची फॅमिली पार्टनर आहे. प्रवीण राऊत यांच्या फॅमिलीने संजय राऊत यांच्या फॅमिलीला पैसे पाठवले आहेत.







