नवी दिल्ली (वृत्त संस्था) – संपूर्ण जग कोरोना संसर्गाशी लढा देत आहे. या कठीण काळात सध्या व्हॅक्सीनलाच या जीवघेण्या व्हायरसपासून वाचवण्याचा परिणामकारक उपाय मानले जात आहे. परंतु, या दरम्यान मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि जगातील टॉपचे बिझनेसमन बिल गेट्स या गोष्टीवरून टीकेच्या केंद्रस्थानी आले आहेत की, विकसनशील देशांसोबत लसीचा फार्म्युला सामायिक केला नाही पाहिजे.
प्रत्यक्षात, स्काय न्यूजसोबतच्या मुलाखतीमध्ये बिल गेट्स यांना विचारण्यात आले की, व्हॅक्सीनवरील इंटॅलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटची सुरक्षा हटवली गेली आणि ती जगातील देशांसोबत फार्म्युला सामायिक केला गेला तर यामुळे सर्वांपर्यंत लस पोहचण्यास मदत मिळेल का?
अमेरिकन फॅक्टरी आणि भारतील फॅक्टरी यात अंतर
यावर बिल गेट्स यांनी सहजपणे म्हटले, ‘नाही.’ त्यांनी म्हटले, जगात व्हॅक्सीन बनवणार्या अनेक फॅक्टरी आहेत आणि लोक लसीच्या सुरक्षेबाबत खुपच गंभीर आहेत. तरीसुद्धा औषधाचा फॉर्म्युला सामायिक करू नये. अमेरिकेची जॉन्सन अँड जॉन्सनची फॅक्टरी आणि भारताच्या फॅक्टरीत अंतर आहे. व्हॅक्सीन आम्ही आमच्या पैशाने आणि तज्ज्ञांकडून बनवतो.







