जळगाव ( प्रतिनिधी) – जिल्हा कोवीड रुग्णालयाने आज पाठवलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात दिवसभरात दोन बाधित रुग्ण आढळले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७४९ बाधित रुग्ण आढळून आले आहे यापैकी १ लाख ४० हजार १६० रुग्ण बरे होऊन घरी परतला आहे. त्याचप्रमाणे २ हजार ५७५ रुग्ण उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज जळगाव शहर १ व जामनेर तालुक्यात १ रुग्ण असे दोन रुग्ण आढळले आहे. जिल्ह्यात सध्या १४ रुग्ण ॲक्टिव्ह आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी आज सायंकाळी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.