यावल (प्रतिनिधी ) – यावल – फैजपूर मार्गावरील ‘सांगवी -हिंगोणा’ गावातील रस्त्याच्या मध्यभागी दुपारी दोन अडीच वाजेच्या सुमारास अपघात घडला आहे.
छोटू केसरसिंग बारेला यांची मोटरसायकल (क्रमांक एमएच १५, बी ८८३३) तर अब्दुत हाफीज यांची मोटरसायकल (क्रमांक एमएच ३९ , एक्स ०५७६) यांच्यात समोरासमोर धडक जोरदार धडक झाली.
पेट्रोल पंप परिसरात दोघं मोटर सायकलींनी दिलेल्या जोरदार धडकेत झालेल्या भीषण अपघातात चोपडा येथील अब्दुल हाफीज आणि विटवा, ता. रावेर येथील ३९ वर्षीय छोटू केसरसिंग बारेला हे दोघंही मोटर सायकल चालक हे गंभीर जखमी झाले असून दोघांना यावलच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय आधिकारी डॉ.बी. बी. बारेला यांनी तात्काळ प्रथम उपचार करून दोघांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने त्यांना तात्काळ जळगावच्या सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.