मुंबई (वृत्तसंस्था) – गोवा येथे संपन्न झालेल्या नेल्सन मंडेला नोबेल शांतता पुरस्कार व अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पिस या विद्यापीठाची मानद डॉक्टरेट मा. तानाजी भाऊ जाधव , राष्ट्रीय अध्यक्ष टायगर ग्रुप याना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल देण्यात आला. त्याच बरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर टेनिसपटू लिअँडर पेस खेळ , कुस्तीपटू संग्राम सिंग खेळ , अभिनेत्री झरीन खान कला , कर्नल शैलेंद्र सिंग , व्यावसायिक राकेश झुंझुंवाला याना सुद्धा मानद डॉक्टरेट उपाधीने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मधूकृष्णन व बॉस्नियाचे राजदूत सुहास मंत्री हे उपस्तिथ होते. तसेच नेल्सन मंडेला नोबेल पिस अवॉर्ड अकादमीचे चेअरमन अध्यक्ष डॉक्टर राजकुमार टाक, उपाध्यक्ष डॉक्टर विजय सिंह पाटील , सेक्रेटरी जोशुआ इमान्यल उपस्तिथ होते.








