भडगांव (प्रतिनिधी)- भडगांव शहर व तालुक्यात महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत याबाबत खासदार उन्मेष पाटील व आमदार किशोर पाटील यांना भडगांव पो. स्टे. महिला दक्षता समिती अध्यक्षा योजना पाटील, उपाध्यक्षा मिना बाग, सदस्या रेखा पाटील, सुशिला पाटील, लता पाटील, नूतन पाटील, ज्योती पाटील, साजिदा शेख, सुषमा भावसार आदि सदस्यांनी दि.21/01/2022 पासून निवेदनाद्वारे मागणी केली आहे. लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जावेत तसा आपल्या स्तरावर पाठपुरावा व्हावा. शहर व तालुक्यात गुन्हेगारी, चोरी, हाणामारी, मुलींची छेडछाड आदि अवैध्य बाबींना आळा बसावा तसेच सुरक्षतेच्या बाबतीत दक्षता घ्यावी यासाठी दक्षता समिती अध्यक्षा योजना पाटील यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.