जळगाव ( प्रतिनिधी ) – बिबानगर येथील विशाल गणेश साळूंखे या तरूणाने राहत्या घरामध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री १०.२० वाजेपूर्वी घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शुक्रवारी रात्री विशाल साळूंखे याने घरातील सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना कुटूंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एकच आक्रोश केला. नंतर विशाल याचा मृतदेह खाली उतरवून जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. याठिकाणी वैद्यकिय अधिका-यांनी विशाल याला तपासणीअंती मृत घोषित केले. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजून आलेले नसून याप्रकरणी रात्री उशिरा तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.