सरपंच ज्ञानेश्वर महाजन यांनी मानले खासदार उन्मेश पाटील यांचे आभार

चाळीसगांव (प्रतिनिधी) – चाळीसगांव भडगाव हायवे लगत असलेले दोन हजार लोकवस्तीचे हिंगोणे गाव परिसराच्या विकासासाठी खासदार उन्मेश पाटील यांनी सदैव मदतीचा हाथ पुढे ठेवला आहे. जेव्हा जेव्हा गावाच्या आणि परिसराच्या विकासाची कुठलेही काम खासदार उन्मेश पाटील यांच्या कडे मांडले असेल तर त्याला नेहमी आग्रही भूमिका घेत मदत केली आहे.
हिंगोणे खुर्द ते हिंगोणे सिम सार्वे रस्ता त्यांच्या मुळे मंजूर झाला. ते काम पूर्णत्वाकडे जात असून त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांची रस्त्याची गैरसोय संपली. आज शेतकरी, गावकरी यांना दळणवळण सुलभ होण्यासाठी मदत झाली आहे. त्यामुळे खासदार उन्मेश पाटील यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो अशी भावना सरपंच ह.भ.प.ज्ञानेश्वर माउली महाराज यांनी व्यक्त केली आहे. सत्कार प्रसंगी बेलगंगा कारखाना माजी संचालक बाळासाहेब पाटील, उपसरपंच मांगो पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय बागुल, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जैन, व्यापारी आघाडीचे अजय वाणी, अमीत सुराणा आदी मान्यवर उपस्थित होते.
रस्ता पूर्ण होत असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंद
खासदार उन्मेश पाटील यांच्या मार्गदर्शनातून हिंगोणे खुर्द ते हिंगोणे सिम सार्वे रस्ता मंजूर झाला होता. आज या रस्त्याचे काम पूर्ण होत आहे.
ह.भ.प.ज्ञानेश्वर माउली महाराज यांनी उन्मेश पाटील यांच्या कडे सतत विकास कामांबाबत संपर्क ठेवला आणि खासदार उन्मेश पाटील यांनी सरपंच उपसरपंच,ग्रा.प. पदाधिकारी यांना शब्द दिला व तो उन्मेश पाटील यांनी खऱ्या अर्थाने आज पूर्ण केला आहे. आज डांबरीकरण, काँक्रीटीकरण तसेच पुलाच्या रेलिंगचे काम अंतीम टप्प्यात असून परिसरातील ग्रामस्थांची गैरसोय संपली असल्याने सरपंच ह.भ.प.ज्ञानेश्वर माउली महाराज यांनी खासदार उन्मेश पाटील यांचे शाल श्रीफळ देऊन आभार व्यक्त करत सत्कार केला आहे. याबाबत लेखी पत्र देऊन हिंगोणे खुर्द , हिंगोणे सिम, सार्वे परिसरातील हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पूर्ण होत असल्याने तमाम ग्रामस्थांच्या वतीने खासदार उन्मेश पाटील यांचे अभिनंदन करीत आभार मानले आहेत.







