• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

या कारणासाठी टेमघर खडकवासला धरणात रिकामे करण्यास सुरुवात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 3, 2021
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – टेमघर धरणाच्या दुरुस्तीसाठी धरणातील पाणी खडकवासला धरणात सोडण्यात येत आहे. शहराला खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या चार धरणांमधून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. वरसगाव, पानशेत आणि टेमघर या तीन धरणांमधून टप्प्याटप्याने शहरासाठी पाणी खडकवासला धरणात सोडले जाते. यावेळी पाणी सोडताना पहिले प्राधान्य टेमघर धरणाला दिले आहे.

शहरासाठी आधी टेमघर धरणातील पाणी खडकवासला धरणात सोडण्यात आले. टेमघर धरण लवकर रिकामे केले तरी शहराच्या पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होणार नसल्याची माहिती पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. सध्यस्थितीत टेमघर धरणात फक्त 25 टक्के म्हणजे सुमारे 1 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीस धरण दुरुस्तीचे काम सुरु होण्याची शक्‍यता आहे. शेवट्याच्या टप्प्यातील हे काम असल्यामुळे ते पूर्ण झाल्यानंतर धरणातील गळती थांबण्यास मदत होणार आहे, असे पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. टेमघर धरण बांधण्याचे काम 2001 मध्ये पूर्ण झाले.

टेमघर धरणाची एकूण क्षमता पावणेचार टीएमसी इतकी आहे. धरण पूर्ण झाल्यानंतर अवघ्या 15 वर्षांत धरणातून मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे धरण दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला. धरणात पाणी असताना हे काम करणे शक्‍य नसल्यामुळे धरणातील पाणी पिण्यासाठी खडकवासला धरणात सोडण्यात येते. धरण रिकामे झाल्यानंतर मगच दुरुस्तीचे काम करण्यात येते. यंदा टेमघर धरण 100 टक्के भरण्यात आले होते.

धरण दुरुस्तीचा पहिले दोन्ही टप्पे पूर्ण झाले आहे. तिसऱ्या टप्प्यात धरणाची आतील बाजूस सिमेंटचे आच्छादीकरणाचे काम सुरू आहे. टेमघर धरणाची उंची 86 मीटर तर लांबी 1075 मीटर आहे. एवढ्या भागामध्ये सिमेंट आच्छादीकरण केले जाणार आहे. आतापर्यंत 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. पावसाळा व अन्य कारणांमुळे हे काम थांबले होते. उर्वरीत 30 टक्के दुरूस्तीच्या कामाला पुढील महिन्यापासून सुरूवात होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर धरणातील गळती 100 टक्के बंद होणार आहे, असा दावा पाटबंधारे विभागाकडून करण्यात आला.


 

 

Previous Post

जिल्ह्यात ४२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले

Next Post

सुव्यवस्थेचा मुद्दा स्थानिक प्रशासनाशी निगडीत – कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सुव्यवस्थेचा मुद्दा स्थानिक प्रशासनाशी निगडीत - कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon