चोपडा (प्रतिनिधी) – चोपडा शहर आणि तालुका काँग्रेसतर्फे 3 डिसेंबर रोजी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील यांचे नेतृत्वाखाली दिल्लीतील शेतकरी मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी, काळे कृषी कायदे रद्द करण्यासाठी, चोपडा तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळेस संदिप पाटील यानी केंद्र सरकारच्या धोरणावर कडक टीका केली.
केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष सुरेश पाटील, जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील, तालुकाध्यक्ष राजाराम पाटील, शहर अध्यक्ष के. डी. चौधरी, मार्केट कमिटीचे ऊपसभापती नंदकिशोर सांगोरे, सूतगिरणीचे संचालक राजेंद्र पाटील, शिरीष बडगुजर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष किरण सोनवणे, दिलीप जैन, ॲड. संदेश जैन, अकबर पिंजारी, ईलियास पटेल, एनएसयूआय अध्यक्ष चेतन बाविस्कर, सोहन सोनवणे, विशाल भोई, राहुल निकुंभ , सतिश पाटील,साखर कारखाना संचालक गोपाल धनगर, प्रदीप पाटील, रमाकांत सोनवणे, अॅड. ए. ए. जहागीरदार, धारासींग बारेला, रमेश एकनाथ शिंदे, कांतीलाल जगतराव सनेर, ॲड. एस. डी. पाटील, चिरागोद्दीन जहागीरदार, डाॅ . अशोक कदम, गोपीचंद रघुनाथ चौधरी, सूर्यकांत के. चौधरी, अशोक साळुंखे, मेहमूदअली सैय्यद, आदी काग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर ऊपस्थित होते. यावेळी कॉम्रेड अमृत महाजन आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संदीप पाटील यांनी दिला.